Posts

Showing posts from December, 2011

अण्णा हजारेंना पत्र.

अण्णांना,       खरं सांगू अण्णा, चांगदेवाला तो ज्ञानदेवापेक्षा वयाने मोठा असूनही ज्ञानदेवाला पत्र लिहिताना कोणत्या वचनाने लिहावे असा प्रश्न पडला होता. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असूनही मला तो पडलेला नाही. कारण आदरणीय म्हणावे असे तुम्ही नाही आहात,एवढं मात्र खरं.        अलीकडील तुमची बरीचशी विधाने ही अनेकांना बेदरकार वाटताहेत मात्र आम्हाला तुमच्या (अ)संयमाची माहिती असल्याने त्यात काहीही विशेष वाटले नाही. तुमचा बेतालपणा व फटकळ बोलणं ह्यामुळे तुम्ही स्वत:च्याच लोकपाल आंदोलनाची हवा घालवलेली आहे हे सगळ्यांना आता कळून चुकले आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर हल्ला झाला आणि तुम्हाला हे कळताच पटकन तुमच्या तोंडातून बाहेर पडलेल्या "एकही मारा" या शब्दांनी तुम्ही तुमच्या खऱ्या अंतरंगाचे दर्शन साऱ्या भारताला घडवले. काही वेळानंतर तुम्हाला तुमची चूक लक्षात आल्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मिडीयाने घेतला अशी सारवासारव करू लागला व हा हल्ला पवारांवर नाही तर लोकशाहीवर आहे अशी टोटल 'बेदी'छाप वाक्ये फेकू लागला. हे सारं पाहिल्यानंतर तुमच्यावर ओढवलेल्य

उद्योगविश्वातला तारा..

              कुठेतरी वाचनात उपनिषदांचा संदर्भ आला होता. उपनिषदांमधलं एक संस्कृत वचन तिथे दिलं होतं. ते वचन नेमकं आता आठवत नाही. मात्र अर्थ लक्षात आहे. अर्थ असा होता "सज्जनाला नेहमी दुर्बलतेचा शाप असतो व समर्थला दुर्जनेतच वरदान असतं." मग पुढे लेखकाने सज्जन हे चारित्र्यवान असतात पण समाजात घडण्याऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी कमी पडतात किंवा अनेकदा दुर्बल ठरतात. तर जो हे सगळं करू शकेल तो 'समर्थ', दुर्दैवाने ब ऱ्या चदा दुर्जन कसा असतो हे मार्मिकपणे पटवून दिले होते. तसेच, शेवटी तुम्ही 'समर्थ सज्जन' बना असा गोड संदेशही दिला होता आणि मूल्यांचं   महत्व  अधोरेखित केलं होतं. हे आठवण्याचं कारण एवढंच, की मानवी मुल्ये व नैतिकतेचा हळूहळू ऱ्हास होत असलेल्या या ढासळत्या युगातही या मूल्यांना केंद्रबिंदू मानून जगणारी काही माणसं अथवा संस्था अजून आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांना "समर्थ सज्जन" म्हणावं अशी चारित्र्यवान व कार्यक्षम माणसं, अशा संस्था. टाटा उद्योगसमूह हा त्यापैकीच एक. टाटा उद्योगसमूह हा फक्त उद्योगसमूह कधीच नव्हता तर स्वच्छ  कारभार, सामाजिक