Posts

Showing posts from February, 2014

‘इट्स कॉंप्लिकेटेड’

 “टाईमपास बघितलास का? “ मित्राचा फोनवर पहिलाच प्रश्न. “हो. आजच तू?” “मीसुद्धा आजच पाहिला.” “कसा वाटला?”    “ठीक. मात्र हा विषय वेगळा आहे.” ‘टाईमपास’बद्दल एकदोन मित्रांनी बरंच काही सांगितलं, की ‘हा विषय वेगळा आहे.’, ‘ दिग्दर्शकाने पौगंडावस्थेतील प्रेम अलगदपणे हळुवार मांडलंय’, एका मित्राने तर रिलेशनशिप, स्पेस वगैरे जाडजूड शब्द वापरून काहीबाही सांगितलं. आता तर व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने येणारे लेखही तेच - पौगंडावस्थेतील मुलांच्या प्रेमाबद्दल लिहिताहेत. त्याच पौगंडावस्थेतील मुलांच्या प्रेमाची ही एक बाजू .   ‘टाईमपास’मुळे म्हणा, उत्सुकता म्हणून म्हणा किंवा लेख लिहायच्या निमित्ताने म्हणा फेसबुकवर काही निवडक ‘यंगस्टर्सच्या’ प्रोफाइल्स पाहिल्या. (यंगस्टर्स शब्द लिहिताना स्वत: म्हातारे झालोय अशा अविर्भावात लिहावयाचा असावा बहुधा. कारण   इथं लिहिताना आपोआप तसा अभिनिवेश अंगात शिरतोय असं वाटतंय.) हे ‘यंगस्टर्स’ म्हणजे आमच्यापेक्षा अजून थोडे यंग - पंधरा, सोळा आणि सतरा या वयोगटातले. यातल्या अनेकांसाठी ‘रिलेशनशिपमध्ये असणे’ हे कॉमन होते. काहींच्या प्रोफाइल्स किंवा त्यांच्या स