Posts

Showing posts from October, 2011

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

               दुर्गाबाईंचं लिहिणं हा कौतुकाचा नसून चिंतनाचा विषय आहे. बाईंचं लेखन थोडं नीट न्याहाळून बघितलं तर कळतं की बाईंमधल्या लेखिकेवर त्यांच्यातल्या कवयित्रीने मात केलेली आहे. बाई खरंतर कवयित्रीच व्हायच्या, पण चुकून लेखिका झाल्या. त्यामुळेच बाईंच्या लेखनात शब्दांचा ’नाद’ लक्ष वेधून घेतो. ’ऋतुचक्र’ मध्ये हा शब्दनाद प्रकर्षाने आढळतो. ऋतुचक्र हा बाईंच्या सर्व लेखनपसारयातला सुंदर असा मोरपीस आहे. बाईंचं कोणतंही पुस्तक असो, ऋतुचक्र असो वा भावमुद्रा असो किंवा दुपानी असो, त्यांचं निसर्गाशी जडलेलं नातं बाई हळूच खुलवत नेतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पालथे घातलेले डोंगर, दऱ्या,नद्या,नाले, अनेक उपनद्या,ओढे, ओहोळ या सा ऱ्या प्राकृतिक घटकांपासून ते मग अगदी त्यांच्याशी   संबंधित असलेल्या ऋतु व त्यांचे चक्र,त्याचे समाजजीवनावर व अन्य नैसर्गिक घटकांवर उदा. प्राणी, पक्षी इ.वर होणारे परिणाम ह्या सगळ्यांचं वर्णन ओघानं आलंच. फक्त ऋतुचक्र’ वर जरी लिहायचं म्हटलं तरी वहीची कितीतरी पाने भरून जावीत एवढं लिहिता येईल. साधं ऋतुचक्रच्या मलपृष्ठवरचे वर्णन पाहा. " ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्