Posts

जागृती यात्रा भाग ११: हरितप्रदेशातून..

     खिडकीतून बघताना चोहीकडे सगळं कसं हिरवंगार दिसत होतं. मनाने अलवारसा कौल दिला 'उत्तरप्रदेश' आलं. मुबलक पाणी, सुपिक मृदा आणि आपल्याकडे नसते तशी लांबसडक शेती - 'हरितप्रदेश' व्याख्येला या तीन गोष्टी पुरेशा आहेत. उत्तरप्रदेशात पूर्वांचल या नावाने प्रसिद्ध असणा ऱ्या  प्रादेशिक विभागातलं देवरिया हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. देवरियाची विशेष अशी काहीच ओळख नाही पण 'जागृती यात्रा' राबवणाऱ्या जागृती सेवा संस्थानचं हे माहेरघर. देवरियापासून तासाभराच्या अंतरावर असलेलं 'बरपार' हे शशांक मणी (जागृतीचे संचालक) यांचं गाव. स्टेशनवर उतरताच देवरियात 'जागृती'चं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत झालं. तिथून मग लगेच आम्ही बरपारकडे पोहोचते झालो. अगोदर ठरल्याप्रमाणे 'बिझग्यान वृक्ष' (Bizgyan Tree) या स्वाध्यायासाठी आम्हाला बरपार व आसपासची दोन-तीन गावे पालथी घालायची होती. सर्व संघ मग एकत्र जमले. बिझग्यान ही स्वाध्यायाबरोबरच एकमेकांमध्ये स्पर्धाही असल्याने प्रत्येक संघ आपापली व्यूहरचना रचायच्या तयारीला लागला. गावे छोटी-छोटी व जवळ असल्याने एकदम तीन चार गावांच...

जागृती यात्रा भाग १० : बिहारचं 'निदान'

Image
     ३१ डिसेंबर ट्रेनमध्ये साजरा करणे ह्यात वेगळं काहीही नाही. पण नववर्षारंभाचा डान्स ट्रेनमध्ये करणं हा पूर्णपणे नवा अनुभव आमच्यापैकी प्रत्येकजण अनुभवत होता. नवीन वर्ष असल्याने म्हणा किंवा शेड्युलमध्ये असल्याने म्हणा १ जानेवारीला आम्हाला सुट्टी दिली होती. त्या दिवशी ट्रेनमध्ये मात्र विविध सेशन आयोजित केले होते. ट्रेनने अजून ओरिसा सोडलं नव्हतं. ओरिसाच्या सीमेजवळ  कुठेतरी आम्ही होतो. डायरीमध्ये मी काहीतरी टिपत बसलो होतो. साधारणत: दुपारच्या सुमारास ओरिसाची सीमा संपवून पश्चिम बंगालमध्ये आम्ही प्रवेश केला. डायरी तशीच ठेवून मी खिडकी पकडली. बंगभूमी..! रवींद्रनाथ टागोरांची भूमी, विवेकानंदाची भूमी, सुभाषबाबूंची भूमी, सत्यजित रेंची भूमी, कम्युनिस्टांची भूमी. बंगाल या प्रांताबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. या भूमीने देशाला अनेक बुद्धिवंत माणके दिलेली आहेत हे तर सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहेच. पण त्याहीपेक्षा  या ठिकाणी साचलेले  एक विलक्षण वेगळेपण, एक मंतरलेलेपण या भूमीने देशाला दिलेलं आहे असं मला नेहमीच वाटतं. साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, राजकारण अशा ...

जागृती यात्रा भाग ९ : गाथा 'ग्रामविकासा'ची.

Image
      दक्षिणेतून ट्रेनने उत्तरेत शिरकाव केला. भौगोलिक बदलांनुसार साहजिकच वातावरणात गारवाही हळूहळू वाढत चालला होता. पहाटेच आम्ही ओरिसातील जगन्नाथपूर स्टेशनवर उतरलो. धुक्याने दाटलेल्या जगन्नाथपूरातून वाट काढत बसेसपर्यंत पोहोचलो. सर्व यात्रींना घेवून बसेसनी बहरामपूराकडे प्रयाण केले. बहरामपूरातील 'जो मडीएथ' यांच्या 'ग्रामविकास' या संस्थेला आज भेट द्यायची होती. ग्रामविकासमध्ये 'जो'चं भाषण, त्याच्याशी संवाद त्यानंतर दुपारचं जेवण व नंतर केस स्टडी असा एकदम भरगच्च कार्यक्रम होता. ग्रामविकासला पोचल्यानंतर लगेचच कार्यक्रमास सुरुवात झाली. 'जो' हा मूळचा केरळातल्या कांजीरपल्ली या गावचा. मद्रास विद्यापीठात शिकत असताना अभ्यासेतर कार्यक्रमांत आघाडीवर असलेला 'जो' मद्रास विद्यापीठाच्या स्टूडंटस् युनियनचा अध्यक्ष न बनेल तरच नवल. याच काळात 'जो'ने Young Students Movement for Development (YSMD) ची स्थापना केली. ७०चं दशक हे अस्वस्थतेचं दशक होतं. आफ्रिका, द.अमेरिका, व्हिएतनाम आदी ठिकाणी युवक चळवळींनी जोर पकडला होता. भारतातसुद्धा त्याची ठिणगी कुठे न कुठेतरी पडत...

जागृती यात्रा भाग ८: 'नांदी' नव्या युगाची..

        ट्रेनमधील आजचा पाचवा दिवस. ट्रेनमधील एकूण वातावरणाला आता आम्ही चांगलेच सरावलो होतो. प्रेझेंटेशन, सेमिनार्स, ग्रुप अ‍ॅक्टीव्हीटिज, ट्रेनमधल्याच एका डब्यात जागृती स्टाफच्या अभिनव कल्पनेतून तयार झालेल्या कापडी बाथरूम्समध्ये होणारी आमची हलती अंघोळ इ.सगळ्या गोष्टींत जाम मजा यायची. सहकारी यात्रींबरोबर चांगली ओळख होऊ लागली होती. त्यांच्याकडूनसुद्धा बरंच काही शिकण्यासारखं होतं.संपूर्ण यात्रेत जेवढयाजणांना भेटता येईल तेवढ्यांना भेटत होतो, जे काही घेता येईल ते ते वेचत चाललो होतो. काही यात्री स्वत:च रोल मॉडेल्स असल्यासारखे होते. त्यांची माहिती समारोपाच्या ब्लॉगमध्ये देईनच.       तमिळनाडूतला प्रवास संपल्यानंतर आमची ट्रेन आंध्राकडे निघाली. आंध्रपदेशसुद्धा तमिळनाडूसारखंच. तशीच वनराई, मोकळं रान व चरणारी गुरे. तुलनेतला वेगळेपणा म्हटलं तर इथे असलेल्या शंकूच्या आकाराच्या राहुट्या. खिडकीतून दुरून साजरे दिसणारे अचल डोंगर एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखे दिसत होते. इथंली सुंदर वृक्षराजी मनात व्यापून जाते व नकळत हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून ज...

जागृती यात्रा भाग ७ : खेडयाकडे चला...?

Image
         मदुराईपासून खरं तर चेन्नई अवघ्या काही तासांच्या अंतरावर. पण ट्रेनचा वेग कमी असल्याने दुपारी बारानंतर आम्ही चेन्नईत पोहोचलो. चेन्नईमध्ये परतीच्या मान्सूनची भीती होतीच. ती खरी ठरली. ऐन हिवाळ्यातसुद्धा तिथं हलकासा पाऊस पडत होता. दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास आम्ही चेन्नईतील 'कांचीपूरम' स्टेशनवर उतरलो. स्टेशनबाहेर कुठेही 'जागृती'च्या बसेस नव्हत्या. त्याचं कारण आजची भेट मुळी धावतीच नव्हती. सर्व यात्रींना स्टेशनपासून जवळच असलेल्या एका ठिकाणी जायच्या सूचना दिल्या गेल्या. स्वयंसेवकांच्या दिशादर्शनानुसार आम्ही सर्व यात्री सुमारे एक किलोमीटरभर चालत एका जुन्या इमारतीत गेलो. ही इमारत म्हणजे कोणतेही कार्यालय नव्हते की कोणतीही कंपनी. आज ज्या संस्थेला-'ट्रॅव्हल अनादर इंडिया' (TAI) ला आम्ही भेट देणार होतो त्यांचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. हॉल साधाच होता. बसण्यासाठी फक्त कार्पेटची सोय केली होती, ज्यावर फक्त अर्धेच यात्री मावू शकले. राहिलेल्यांच्या कार्पेट नाहीय, आवाज नीट ऐकू येत नाही इत्यादी कुरबुरी सुरु झाल्यात. मात्र, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात...

जागृती यात्रा भाग ६ : 'अरविंद आय केअर'

Image
     बेंगलोरमधून निघाल्यानंतर ट्रेनने रात्रीच्या प्रवासात कर्नाटक, आंध्रप्रदेश ह्या राज्यांच्या सीमा पार करत पहाटेच कधीतरी तमिळनाडूत प्रवेश केला. दररोज सकाळी उठण्यासाठी आम्हाला ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचना दिली जायची. आज मला त्याच्याही अगोदर जाग आली. प्रातर्विधी व अंघोळ उरकल्यानंतर खिडकीशेजारी येऊन बसलो. बाहेर दिसणारे तमिळ फलक, गावातल्या घरांची ती विशिष्ट रचना, गर्द हिरवळीनं बहरलेली भोवतालची सुपीक शेतं, घराभोवती एका ओळीत उभी असलेली नारळाची झाडे, हिरव्यागार गवताचं पसरलेलं लांबसडक कुरण व त्यात चरणाऱ्या गायी, नुकत्याच पडलेल्या सोनेरी उन्हात चमकणाऱ्या केळीच्या बागा असं डोळ्यांचं पारणं फेडणारं विलोभनीय दृश्य दिसत होतं. खिडकीबाहेरचा दिसणारा हा एवढा सुंदर नजरा व हलक्याश्या थंडीच्या या सौंदर्यात भर टाकायला लगेच आलेलं गरमागरम उप्पीट,ब्रेडजाम व वाफाळलेली कॉफी... अहाहा! खरंच आनंदाचा हा क्षण हातातून कधीच निसटू नये असं मनोमन वाटत होतं. आपल्या आयुष्यतले क्षण पकडून ठेबता आले असते तर? असा एक कवीकल्पनेतील विचार माझ्या मनात पटकन उमटू न गेला. नाश्ता करत असतानाच मी कॅमेरा काढ...

जागृती यात्रा भाग ५ : ग्रेट भेट.

Image
                  हुबळी-धारवाडची सेलको भेट व नंतर होन्नापुरातील ग्रामस्थांशी संवाद झाल्यावर आमची बस हुबळी स्टेशनकडे निघाली. दिवसभरात खूप काही गवसल्यासारखं वाटत होतं. बसमध्ये खिडकीजवळ बसून कर्नाटकातील खेडी बघत निघालो होतो. आपल्याकडे दिसतात तीच नेहमीची दृश्ये भराभर नजरेआड होत होती. हिरवीगार शेतं, रस्त्याने जाणारी गाईगुरे, डोक्यावर गवताचा भर घेऊन जाणाऱ्या बायका, चौकातल्या दुकानांवरचे कानडी फलक इत्यादी दृश्ये बघत असताना बसने धारवाडमध्ये कधी शिरकाव केला तेच कळलं नाही. धारवाडमध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच सेलकोच्या गतीला आर्थिक उर्जा देणाऱ्या कर्नाटक ग्रामीण विकास बँकेचं (KGVB) मुख्यालय दिसलं. एका ठिकाणी शाळा सुटली होती. पोरं घरी निघालेली. आमच्या सलग दहा-बारा गाडया दिसताच पोरं हात दाखवत ओरडायला लागलीत. लहानपणचे दिवस आठवलेत. ट्रेन मध्ये गेल्यावर डायरीत हे सगळं टिपायचं व त्यानंतर उद्याच्या भेटीचा गृहपाठ आजच करायचा हे पक्क केलं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या दिवशी बेंगलोरमध्ये आम्ही नारायणमूर्तींना भेटणार...