एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.
काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता. पूर्ण मेल गांधीजींबद्दल होता. मेल वाचला. त्यात पाकिस्तानला दिले गेलेले पंचावन्न कोटी, फाळणीच्या वेळचा गांधीजींचा नौखाली दौरा, त्याच वेळी सीमेवर होत असलेला रक्तपात व भीषण अत्याचार इत्यादी अनेक गोष्टींना गांधीजींना जबाबदार धरण्यात आले होते व त्यामध्ये गोडसेचा गोडवा गायला होता. मेलमध्ये गांधीजींच्या बाबतीत बरचंस गरळ ओकणारं काहीसं लिहिलं होतं. गांधीजींवर हे असे बिनबुडाचे आरोप करुन आपला मूर्खपणा व मनाचा कोतेपणा जगजाहीर करणार्यांचं मला खुप हसु येतं. एकूण काय, गांधीजींवरील या व अशा स्वरुपाच्या इतर आरोपांचे खंडण करण्यासाठी हा ब्लॊग नक्कीच लिहिलेला नाही. कारण खंडणमंडण करण्यामध्ये फक्त वेळ जातो. त्यातून साध्य तर काहीच होत नाही. मी माझ्या साऱ्या वाचन-चिंतन प्रवासात मला उलगडलेले गांधीजी इथे मांडले आहेत. वाचन तर लहानपणापासून होतंच पण कॉलेजला आल्यावर मात्र त्याची व्याप्ती वाढली. त्यात मग वाचन, चर्चा, व्याख्यानं, चिंतन इ. ची भर पडली. ’राजाराम’ कॉलेजला असताना असल्या (वर उल्लेखलेल्या) व तत्सम विषयांवर आमच्या अक्षरशः चर्च