यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द (भाग २).
यशवंतरावांनी केंद्रात संरक्षण , परराष्ट्र , गृह , अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद आदी विविध पदे भूषवलीत हे खरं व ही सारी पदे भूषवणारे यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व हेही तेवढंच खरं. पण नाण्याची ही एक बाजू झाली. यशवंतरावांच्या दिल्ली कारकिर्दीला दुसरी एक बाजू होती , जी खूप कमीजणांना माहित असेल. यशवंतराव दिल्लीसाठी नेहमीच होते. पण दिल्ली त्यांच्यासाठी नव्हती. यशवंतरावांनी दिल्लीला आपलं सर्वस्व दिलं पण दिल्लीनं त्यांना कधीच आपलंसं करून घेतलं नाही. अर्थात खुद्द यशवंतरावही याला बरेचसे जबाबदार होते. १९६२ साली चीनच्या आक्रमणानंतर केंद्रात नेहरूंना कणखर संरक्षणमंत्र्याची गरज भासू लागली. म्हणून यशवंतरावांना नेहरूंनी केंद्रात बोलवून घेतले. यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द आरंभीच्या १० वर्षांत त्यांची लोकप्रियता व देशातील मान्यता वाढविणारी ठरली. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्यांची पकड घट्ट राहिली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणीही असले तरी सत्तेची खरी सुत्रे त्यांच्याच हातात राहिली. १९६३ मध्ये कन्नमवारांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब देसाईंसार