उत्तरे
प्रश्न गुंतागुंतीचे बनत चालले आहेत, त्याची उत्तरे कशी शोधू आता ? असं नेहमीच वाटतं. पण परमेश्वरा नेहमी तूच मदत करतोस, त्या प्रश्नांची अनोखी उत्तरे तुझ्या भाषेत देऊन. कदाचित त्यावेळेपुरता तूच माणसात अवतरत असावास, ती उत्तरे शोधण्यासाठी, अन लुप्त होत असावास माणसातून, एकदाची उत्तरे सापडल्यावर. म्हणूनच तर जे जे उत्तम, उदात्त व चांगले ते ते सर्व तू माणसात अवतरल्यावर होत असावे, अन राहिलेलं सगळं मात्र माणूस स्वत: करतो, तुझा अंश त्यावेळी त्याच्यात नसताना. व त्या वाईट गोष्टींचे खापर मात्र तो फोडतो तुझ्यावर. पण हे परमेश्वरा तुझ्याशिवाय कोण सांभाळेल तुझ्या या लेकराला - या माणसाला ? अन म्हणूनच तू म्हणतोस की '' क्षमा कर त्यांना. त्यांना हे कळत नाही की ते काय करताहेत "