Posts

Showing posts from June, 2012

यशवंतराव.. (भाग १)

      २०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल...     यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता , अस्सल साहित्यरसिक , कृष्णाकाठचा सह्यकडा , युगपुरुष , हिमालयाची ढाल , किर्तीवंत वगैरे , वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव...    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून

मुक्तायन:'बारसं ब्लॉगचं'

             Prathamesh's Blog या नावाने सुरू असलेला माझा ब्लॉग आता ' मुक्तायन ' या नव्या नावाने कात टाकतोय . या ब्लॉगपोस्टचं शीर्षक जरी ' बारसं ब्लॉगचं ' असलं तरी हे बारसं नाहीये . एखाद्या नवजात शिशूच्या नामकरणासारखं नव्या ब्लॉगच्या नामकरणाला बारसं उल्लेखणं यथार्थ ठरलं असतं . त्यामुळेच दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर होणार्या बदलाला बारसं कसं म्हणता , असा आक्षेप जर कुणी घेत असेल तर त्यात नक्कीच तथ्य आहे . ब्लॉगचं नवं नामकरण असंही शीर्षक योग्य ठरलं असत पण बारसं म्हणण्यामागे थोडा वेगळा विचार आहे . घरात होणारा बारशाचा सोहळा हा आनंददायी असतो . खचितच ब्लॉगच्या नामकरणाचा क्षणही मग ते दोन वर्षानंतर का असेना , तेवढाच आनंद ब्लॉग व ब्लॉगलेखकाच्या आयुष्यात घेऊन येतो . अर्थातच हा बदल फक्त नावापुरता आहे , विषय अथवा लेखनातला नाही . ब्लॉग सुरू करून तशी आता दोन वर्षे झालेली आहेत् सुरुवातीला काहीच माहित नव्हतं - ब्लॉग कसा असतो , काय लिहायचं असतं . नंतर मग इतरांचे ब्लॉग्