अण्णा हजारेंना पत्र.
अण्णांना, खरं सांगू अण्णा, चांगदेवाला तो ज्ञानदेवापेक्षा वयाने मोठा असूनही ज्ञानदेवाला पत्र लिहिताना कोणत्या वचनाने लिहावे असा प्रश्न पडला होता. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असूनही मला तो पडलेला नाही. कारण आदरणीय म्हणावे असे तुम्ही नाही आहात,एवढं मात्र खरं. अलीकडील तुमची बरीचशी विधाने ही अनेकांना बेदरकार वाटताहेत मात्र आम्हाला तुमच्या (अ)संयमाची माहिती असल्याने त्यात काहीही विशेष वाटले नाही. तुमचा बेतालपणा व फटकळ बोलणं ह्यामुळे तुम्ही स्वत:च्याच लोकपाल आंदोलनाची हवा घालवलेली आहे हे सगळ्यांना आता कळून चुकले आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर हल्ला झाला आणि तुम्हाला हे कळताच पटकन तुमच्या तोंडातून बाहेर पडलेल्या "एकही मारा" या शब्दांनी तुम्ही तुमच्या खऱ्या अंतरंगाचे दर्शन साऱ्या भारताला घडवले. काही वेळानंतर तुम्हाला तुमची चूक लक्षात आल्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मिडीयाने घेतला अशी सारवासारव करू लागला व हा हल्ला पवारांवर नाही तर लोकशाहीवर आहे अशी टोटल 'बेदी'छाप वाक्ये फेकू लागला. हे सारं पाहिल्यानंतर तुमच्यावर ओढवलेल्य