अण्णा हजारेंना पत्र.
अण्णांना,
खरं सांगू अण्णा, चांगदेवाला
तो ज्ञानदेवापेक्षा वयाने मोठा असूनही ज्ञानदेवाला पत्र लिहिताना कोणत्या
वचनाने लिहावे असा प्रश्न पडला होता. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असूनही
मला तो पडलेला नाही. कारण आदरणीय म्हणावे असे तुम्ही नाही आहात,एवढं मात्र
खरं.
अलीकडील तुमची बरीचशी विधाने ही अनेकांना बेदरकार
वाटताहेत मात्र आम्हाला तुमच्या (अ)संयमाची माहिती असल्याने त्यात काहीही
विशेष वाटले नाही. तुमचा बेतालपणा व फटकळ बोलणं ह्यामुळे तुम्ही स्वत:च्याच
लोकपाल आंदोलनाची हवा घालवलेली आहे हे सगळ्यांना आता कळून चुकले आहे.
दिल्लीत काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर हल्ला झाला
आणि तुम्हाला हे कळताच पटकन तुमच्या तोंडातून बाहेर पडलेल्या "एकही मारा"
या
शब्दांनी तुम्ही तुमच्या खऱ्या अंतरंगाचे दर्शन साऱ्या भारताला घडवले. काही
वेळानंतर तुम्हाला तुमची चूक लक्षात आल्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा
अर्थ मिडीयाने घेतला अशी सारवासारव करू लागला व हा हल्ला पवारांवर नाही
तर लोकशाहीवर आहे अशी टोटल 'बेदी'छाप वाक्ये फेकू लागला. हे सारं
पाहिल्यानंतर तुमच्यावर ओढवलेल्या केविलवाण्या परिस्थितीची जाणीव झाली व
तुमची कीव आली. तसा, मी शरद पवारांचा समर्थक नाहीये मात्र तुमच्या तथाकथित
'गांधीवादाचा' बुरखा फाटला हे मला इथं ठळकपणे मांडायचं आहे. अण्णा, तुम्ही
कधीच 'गांधीवादी' नव्हता, आजही नाही आहात हे उघडं-नागडं सत्य आहे.
अण्णा, परवा तुम्ही सहज म्हणाला, ( तुमचं असं का होतं कुणास ठाऊक? तुम्ही सहज म्हणायला जाता आणि जग मात्र निराळेच अर्थ काढून बसतं - तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि मग तुम्हाला परत परत मौनात जावं लागतं ), हां तर परवा तुम्ही सहज म्हणाला की देश व समाज सुधारणेसाठी केलेली हिंसा तुम्हाला मान्य आहे. तुम्ही मग राळेगणसिद्धी मध्ये दारू पिणाऱ्या महाभागांना झाडाला उलटे बांधून कसे फटकावलेत हे नमूद केलतं. तसेच पवारांवरच्या हल्ल्याचं तुम्ही पुन्हा एकदा समर्थन केलंत. शेतकऱ्यांनी गोळीबार झेलला, तर मग कृषीमंत्र्यानं व ज्या माणसानं भ्रष्टाचार केलाय त्यानं एक थप्पड सोसायला काय हरकत आहे असा सवालही केला. पण, अण्णा यातली खरी गोम वेगळीच आहे. हा तुमचा पवारद्वेष लहान पोरालाही स्वच्छपणे कळतोय हो. ज्या 'गांधी'चा फोटो चिकटवून रामलीलावर तुम्ही आपल्या लीलांचं प्रकट दर्शन संपूर्ण जगाला घडवलं, त्या फोटोला तरी निदान जागायचं? अहो, गांधींनी त्यांच्या शत्रूंचा-इंग्रजांचा देखील कधी द्वेष केला नाही. त्यांचा इंग्रजांना विरोध होता मात्र इंग्रजांबद्दल गांधीजींना द्वेष नव्हता. गांधीजी म्हणायचे विरोध व्यक्तीला नको तर प्रवृत्तीला करा. त्या माणसाचं जगणंच वेगळं होतं हो. गांधीजींचे प्रयोगच अंतर्शुद्धीचे होते म्हणून ते सत्याचे प्रयोग होते. मात्र तुम्ही गांधींचं नाव घेता आणि सरळसोटपणे हिंसेचं समर्थन करता. अहो, इथंच तुमच्यातला अज्ञानी गांधी दिसतोय.गांधीजींची अहिंसेबद्दल खूप चिंतन केलं होतं. त्यांची हिंसेची व्याख्या खूप सूक्ष्म आहे. गांधीजी म्हणायचे," एखाद्याला फक्त शारीरिक मारहाण अथवा दुखापत करणे हीच हिंसा नसून त्याला आपल्या शब्दांनी दुखावणे हीदेखील हिंसाच आहे."
अण्णा, गांधी आपल्या तत्वांसाठी जगला होता आणि त्या तत्वांसाठी त्याने कोणतीही तडजोड केली नव्हती. गांधीजींच्या मृत्युनंतर एका शोकसभेत एका व्यक्तीने म्हटले होते की ' गांधीजींनी, सत्य व अहिंसा या तत्वांना मोठं केलं'. विनोबांनी ते चुकीचे आहे असे सांगत म्हटले होते की ' सत्य व अहिंसा या तत्वांनी गांधीजींना मोठं केलं'. असं असतं तत्वांसाठी जगणं. तुमची तत्त्वं तर इथं दर आंदोलनागणिक बदलतायंत. लोकपालसाठी गांधीवाद, आणि त्यानंतर मारामारीचा तलवारवाद. ते राहूदे, साधं स्वत:च्या खोटं बोलण्याचंसुद्धा (पवारांवरच्या हल्ल्याची नंतरची प्रतिक्रिया) तुम्हाला काहीच वाटत नाही. स्वत:च्या चुकीचे प्रायश्चित घ्यायचे सोडून तुम्ही त्या चुकीची सारवासारव करता त्याचवेळी तुमच्या गांधीबद्दल असलेल्या आस्थेची पोच कळते. दारू पिणारयांचा प्रश्न गांधीजींच्या वेळीही ऐरणीवर आला होता. पण म्हणून त्यांनी तुमच्या सारखी कुणाला झाडाला उलटे बांधून फटकावले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या की आपले भांडण व्यसनाशी आहे, व्यसनी माणसाशी नाही. त्याला किंवा त्याच्या मानसिकतेला इजा होईल असे काहीही करू नका.
अण्णा,राजेश खन्नाच्या एका चित्रपटातले वाक्य आठवतंय, " It is simple to be happy but it is difficult to be simple". म्हणून सांगतो साधं बनणं एवढं सोपं नसतं. त्या दिवशी तुमच्यापेक्षा पवार जास्त गांधीवादी आणि साधे वाटलेत (नसूनसुद्धा). त्यांचा संयम वाखाणण्याजोगा होता. असुदे, तुमची चूक नाही आहे ही. कुणीतरी म्हटलेच आहे नाहीतरी, प्रसिद्धीचा वारा न लागो बापडां...

तुमचा एक परखड कटू सत्य चिंतक,
प्रथमेश आडविलकर.
ok! Me gandhivar abhyas nahi kela! Naahi annavar kelay!
ReplyDeletePan kuthetari vachale aahe gandhi swata deshyapekhsya mothe
samjat hote! Chukte saglyance! Asehi vachale, pahile(film madhe)
ani aikale ki te bhagat singhana vachvu shakale aste! Nehru pm
bannyamaghe tech hote! Manje konihi dudhane dhutalele nahi ithe!
Saglyanchya kahi na kahi 'dusrya' baaju ahet! Apan changalyacha vichar
karava hech!
Ithehi tech laagu hoil! Annana te gandhi samarthak ahet mhanun
jast lok support na karta te curruption virodhi ahet mhanun kartat!
Tech mehi karto! Gandhivaad, ahinsa, satya...sagle outdated zalay!
Anna pawar slap baddal je kahi bolle te agdi yogya ahe! Te pawar dweshi ahet hehi kharech aahe! Aplayan(common man) tyachi parva nasavi hech bare! Jevadhe anna baddal bolle jaat tevadhe congress, rajkarani, media's partiality hyachya baddal bollat tar bare hoil! Its up to uagain! Vyakti swatyantra aahe! Kahihi bola! Pan justice saglyan sobatach vaava hich iccha!
I support anna coz he is pissing off netas(corrupt) who hv pissed us off alll this while! Thats all!
Blog is good! I agree with ur terms! But still stick to my points!
Keep penning them in!
Pramod!
Pramod, Firstly thanks for your comment.
ReplyDeleteBut when u say protest, protest has also some rules. When u say satyagraha, or aandolan, it should based on some ethical virtues and when those virtues like satya will get abolished from such andolan, there is no point in such satyagraha. It's like u get to do bat becoz of "benefit of doubt" though u knew u r out. Even if u hit then century, what is point in it, if it is "hurting ur heart". Emphasizing Gandhi here is not cultivating Gandhi today, but to exemplify the characteristic property which matters a lot (even more than aandolan), and on which aandolan is established.
Today gandhivad is acceptable or not is different issue, but when Anna uses his principles and he takes gandhi’s name, so it is obvious that people compare him with Gandhi.
i am agree with u prathamesh.......and by the way ur all blogs are very beautiful........its shows ur thorrough study of each and every topic that u had touched till date.......very nice and keep it up...all the best.
ReplyDeletePrathamesh,
ReplyDeleteOne prompt question! Does these rule apply only to sm1 who is fighting for a cause? Does not they hold true for Govt.! U need to be a sword to fight a sword! u can't do it by Gandhi'd stick! Can u!
And i guess u r talking abt self-esteem when u say 'hurting ur heart'! I say to hell with it! There r more things to think abt than this! As a indian my self esteem is thrashed daily by our RULERS. From getting a ration card to getting a passport! from paying pax (which is wasted anyway) n never getting returns of my tax! Seeing people dying like wild animals! Soldiers n farmers never cared and many more!
This campaign could not have been such a success had it not been Anna associated with it. And if u talk abt VALUES, who is following them now! Govt, Netas, ur MLA/MP, Govt officers, Media, journalists, me, u???
Very rare! I wont say on1 but very rare!
This agitation is not inject values to society coz it hard. U cant do it straight away. but to fight evils among us.
I find Anna better in this with regards to what he has done to Ralegaonsiddhi than the netas! (I have just read abt it. Hope its true).
Thanks and Regards
Pramod