मी आज मतदान केलंय होय , मी आज मतदान केलंय. सैल जिभेने बरळणाऱ्या आणि धरणात मुतणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारण्यासाठी मी आज मतदान केलंय . उठसूठ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ‘ राडा संस्कृती ’ त शोधणाऱ्या झुंडशाहीला लोकशाहीचं ‘ खरं बळ ’ दाखवण्यासाठी मी आज मतदान केलंय . समोर सगळं जळतंय हे दिसत असतानाही काहीही न करणाऱ्या धोरणलकव्याला ठोसा मारण्यासाठी मी आज मतदान केलंय. विज्ञानाच्या या युगात अजूनही ढाल- तलवारीची भाषा करून दिशाभूल करणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीला ठेचण्यासाठी मी आज मतदान केलंय . देशासाठी , भविष्यासाठी , उज्ज्वल उद्यासाठी किंवा भावी पिढीसाठी नव्हे तर माझ्यासाठी स्वत:साठी मी आज मतदान केलंय.
गेल्या काही दिवसांपूर्वीच B.Sc.ची Exam संपली. आमचे सगळ्यांचे Supervision सुद्धा संपले होते. ज्या सुट्टीची एवढे दिवस वाट पाहत होतो ती उन्हाळ्याची सुट्टी एकदाची सुरु झाली. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, माझं मन बालपणातल्या उन्हाळ्याची सुट्टीभोवती पिंगा घालू लागतं. एखाद्या जीर्ण वस्त्रातले एकेक धागे जसे बाहेर यावेत तशा एकेक जुन्या आठवणी जाग्या होऊ लागतात. कोल्हापुर जिल्ह्यातालं ' चरण' हे माझं गाव. साधारण १९९४-९५ चा काळ. सगळीकडं जागतिकीकरण सुरु होऊन नुकताच काही काळ लोटलेला. त्यावेळी आमच्या चरणाला अजून जागतिकीकरणाची झळ लागायची होती. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आम्हा बाल- मंडळीसाठी धम्माल असायची . सगळी आतेभावंडं उन्हाळ्याची सुट्टी साठी आजोळी म्हणजे आमच्या घरी आलेली असायची. मग आजी आमच्यापेक्षा ...
Comments
Post a Comment