Posts

Showing posts from December, 2010

‘उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती कार्यक्रम २०११ ’

         उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती (Summer Research Fellowship) ही भारत सरकारच्या विज्ञानातील तीन अग्रगण्य संस्था अनुक्रमे  इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद यांच्याकडून दरवर्षी देण्यात येते.  ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी प्रकल्पासाठी देण्यात येते. या पाठ्यवृत्ती चा कालावधी दोन महिन्यांचा असतो. विद्यार्थी-शिक्षकांच्या सोयीसाठी हे प्रकल्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण करता यावेत अशी योजना असते. २०११ मधील या  पाठ्यवृत्ती साठी विज्ञान शाखेतील विविध विषयांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी:                उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढा वी हा या पाठ्यवृत्तीमागील  प्रमुख उद्देश आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी मार्च २००७ पर्यंत ही पाठ्यवृत...