प्रेमात तुझ्या मी...

प्रेमात तुझ्या मी माझ्यात नकळत पडलो,
कळले न कसे मला, मी मजला कधी विसरलो.

सौंदर्य नितळ तुझे हे असे
मन धुंद वेडे होई जसे,
सांगू तुला मी आता कसे
पाहता तुजला मला काय भासे.

केशसंभार तुझा जेव्हा तू हळूच सावरशी
,
हाय! हृदयातून तेव्हा सुप्त ज्वाला पेटवीशी.
निशा तुझ्या केसांमधली अंधारी ही अशी,
सांजेला त्यात उगवण्यासाठी वेडा होई शशी.

लोचनांच्या तुझ्या त्या लडिवाळ हरकती
एकांतात असलो की अजूनही आठवती.
चंचल नयन तुझे, कधीतरी नजरानजर होई,
अन नकळत तनी माझ्या वीज चमकून जाई.

ओठ तुझे ते गुलाबी-कोमल, फुलांच्या पाकळ्या जणू

चुम्बुनी घ्यावे अन विलग करावे ओले दव कणु.
अधर नव्हेत, हे तर आसुसलेले क्षण गं बावरी !
कवेत ये आता माझ्या, मला मोह न आवरी.

                     

                            - प्रथमेश आडविलकर.

Comments

  1. mast kavita aahe.... premat padalas ki kay???

    premat padalyavarach asala sagala suchu laagata???

    ReplyDelete
  2. अरे, हे जर खरं असेल तर संदीप खरे हा आधुनिक ' कान्हा ' असायला हवा.

    ReplyDelete
  3. छान आहे कविता ........तुला लेखक वैगेरे व्हायच आहे की काय ??
    काय रे आजकाल पोस्ट कमी करतो आहेस.............. का ??

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

जागृती यात्रा भाग ११: हरितप्रदेशातून..

उद्योगविश्वातला तारा..