यशवंतराव.. (भाग १)
२०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल... यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता , अस्सल साहित्यरसिक , कृष्णाकाठचा सह्यकडा , युगपुरुष , हिमालयाची ढाल , किर्तीवंत वगैरे , वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव... ...