Posts

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग १

                सध्या दुर्गा भागवतांचं ' भावमुद्रा ' नावाचं पुस्तक वाचतोय. ' भावमुद्रा ' मध्ये  दुर्गाबाईंच्या काही निवडक लघु निबंधांचा समावेश आहे. दुर्गाबाईंच्या एकूण साहित्यावर एक ओझरती नजर जरी टाकली तरी आपल्या लक्षात येते की, बाई निसर्गवेड्या आहेत. त्यांच्या निसर्गप्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांचं ' ऋतुचक्र '. 'ऋतुचक्र' ने दुर्गाबाईंना तमाम मराठी वाचनवेड्या रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलेलं आहे. दुर्गाबाईंबद्दल बोलायचं अथवा लिहायचं  म्हटलं तर निसर्गाचा उल्लेख ओघानंच येतो. निसर्गावर दुर्गाबाईंनी अतोनात प्रेम केले. फक्त निसर्गावरच नव्हे तर निसर्गातल्या प्रत्येक पशु-पक्षी, जीव-जंतुंवरती त्यांनी प्रेम केलं. निसर्गाचं, सृष्टीचं दर्शन त्यांनी अगदी डोळे भरून घेतलेलं आहे. त्यातल्या पशु-पक्ष्यांचं व छोट्या जीव-जंतुंचं  जीणं बाईंनी लहान मुलाच्या डोळस कुतूहलानं टिपलेलं आहे. पशु-पक्ष्यांच्या, जीव-जंतुंच्या बारीक-सारीक हालचालींचा अभ्यास त्यांनी अगदी निरागसपणे केलेला आहे. त्य...

प्रेमात तुझ्या मी...

प्रेमात तुझ्या मी माझ्यात नकळत पडलो, कळले न कसे मला, मी मजला कधी विसरलो. सौंदर्य नितळ तुझे हे असे मन धुंद वेडे होई जसे, सांगू तुला मी आता कसे पाहता तुजला मला काय भासे. केशसंभार तुझा जेव्हा तू हळूच सावरशी , हाय! हृदयातून तेव्हा सुप्त ज्वाला पेटवीशी. निशा तुझ्या केसांमधली अंधारी ही अशी, सांजेला त्यात उगवण्यासाठी वेडा होई शशी. लोचनांच्या तुझ्या त्या लडिवाळ हरकती एकांतात असलो की अजूनही आठवती. चंचल नयन तुझे, कधीतरी नजरानजर होई, अन नकळत तनी माझ्या वीज चमकून जाई. ओठ तुझे ते गुलाबी-कोमल, फुलांच्या पाकळ्या जणू चुम्बुनी घ्यावे अन विलग करावे ओले दव कणु. अधर नव्हेत, हे तर आसुसलेले क्षण गं बावरी ! कवेत ये आता माझ्या, मला मोह न आवरी.                                                   - प्रथमेश आडविलकर.

‘उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती कार्यक्रम २०११ ’

         उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती (Summer Research Fellowship) ही भारत सरकारच्या विज्ञानातील तीन अग्रगण्य संस्था अनुक्रमे  इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद यांच्याकडून दरवर्षी देण्यात येते.  ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी प्रकल्पासाठी देण्यात येते. या पाठ्यवृत्ती चा कालावधी दोन महिन्यांचा असतो. विद्यार्थी-शिक्षकांच्या सोयीसाठी हे प्रकल्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण करता यावेत अशी योजना असते. २०११ मधील या  पाठ्यवृत्ती साठी विज्ञान शाखेतील विविध विषयांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी:                उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढा वी हा या पाठ्यवृत्तीमागील  प्रमुख उद्देश आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी मार्च २००७ पर्यंत ही पाठ्यवृत...

एका खेळीयाने ...

बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयमच्या इतिहासात रविवार, दि.१० ऑक्टोबर २०१० (१०/१०/१०) हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला असेल. रविवारी सचिनने कसोटीतल्या १४००० धावा पूर्ण केल्या व भारतीय  क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा रोवला. चौकार मारून सचिनने चौदा हजारावी धाव जमवली आणि अख्खं स्टेडीयम त्याला मानवंदना (Standing Ovation) देण्यासाठी उभं राहिलं, तो  क्षण अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. चक्क रिकी पॉनटिंगने सुद्धा सचिनचं अभिनंदन  करावं यातंच सारं आलं. सचिनच्या कसोटीतल्या चौदा हजार धावा असोत किंवा एकदिवसीय – कसोटीतल्या  दोन्ही मिळून त्याच्या पंचवीस हजार धावा असोत अथवा त्याचे शतक-अर्धशतकाचे विक्रम असोत; सचिनची क्रिकेटमधली आकडेवारी व विक्रम यांचं नवल आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. सचिन नुसता   मैदानावर सामना जरी खेळायला आला तरी तो एक नवीन विक्रम होऊन जातो. सचिनची मैदानावरची  फक्त उपस्थिती ही भारतीय संघाला व करोडो भारतीयांना केवढा मोठा दिलासा असतो हे साऱ्या नाच  माहिती आहे. सचिनची खिलाडू वृत्ती फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रीडा जगतातील सर्व खेळा...

मिसकॉल..

माझे आवडते व जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची जाहीर माफी मागून... पाडगावकरांची  एक सुंदर व प्रसिद्ध कविता 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे असतं.. ' ह्या कवितेचं चुकत-माखत विडंबन करण्याचा  प्रयत्न केलेला आहे. तसा विडंबनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न...काही चूक-भूल असेल तर कृपया माफ करावं.   मिसकॉल.. मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो, तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो! काय म्हणता? मिसकॉल हा एक त्रास असतो? कॉल करण्यासाठी दिलेला तो सिग्नल असतो? आणि परत कॉल केल्यावर आपला खर्च वाढणार असतो? असला तर असू दे, वाढला तर वाढू दे! तरीसुद्धा तरीसुद्धा, मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो, तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो! नेहमी जमा खर्चाचाच हिशोब मांडणाऱ्या मंडळीना मिसकॉलचे महत्व काय कळणार? कॅन्टीन मध्ये मैत्रिणीला बोलवण्यासाठी मिसकॉल देता येतो, पऱ्याक्टीकलला लेट होणाराय हे सांगण्यासाठी मिसकॉल देता येतो; लेक्चर सुरु झालंय, पटकन ये हे बजावण्यासाठी मिसकॉल देता येतो; एवढंच काय, या पुढचं लेक्चर बंक करू हे सांगण्यासाठी अगदी चालू लेक्चर मध्ये ...

उत्तरे

प्रश्न गुंतागुंतीचे बनत चालले आहेत, त्याची उत्तरे कशी शोधू आता ?  असं नेहमीच वाटतं. पण परमेश्वरा नेहमी तूच मदत करतोस, त्या प्रश्नांची अनोखी उत्तरे तुझ्या भाषेत देऊन. कदाचित त्यावेळेपुरता तूच माणसात अवतरत असावास, ती उत्तरे शोधण्यासाठी, अन लुप्त होत असावास माणसातून, एकदाची उत्तरे सापडल्यावर. म्हणूनच तर जे जे उत्तम, उदात्त व चांगले ते ते सर्व तू माणसात अवतरल्यावर होत असावे, अन राहिलेलं सगळं मात्र माणूस स्वत: करतो, तुझा अंश त्यावेळी त्याच्यात नसताना. व त्या वाईट गोष्टींचे खापर मात्र तो फोडतो तुझ्यावर. पण हे परमेश्वरा तुझ्याशिवाय कोण सांभाळेल तुझ्या या लेकराला - या माणसाला ? अन म्हणूनच तू म्हणतोस की '' क्षमा कर त्यांना. त्यांना हे कळत नाही की ते काय करताहेत "

ब्लॉंगायन...?

         आज बऱ्याच दिवसांनी माझं ब्लॉंगायन परत एकदाचं सुरु होतयं. मध्यंतरी कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉगकडे ढुंकूनही बघता आले नाही आणि याची दररोज मनात खंतदेखील असायची. मध्यंतरीच्या या काळात प्रवासही भरपूर झाला, मनासारख्या व मनाविरुद्ध घटनाही अनेक घडल्या. त्यामुळे ब्लॉगसाठी बरेचसे विषय मनात दाटले होते पण मोकळा वेळ व कामाचा व्यस्तपणा हे यावेळी एकमेकांच्या व्यस्त मात्रेत ( inversaly proportional to each other ) होते. त्यामुळे मनातले ब्लॉग मनातच राहिले. भिरभिर पडणारा पाऊस, 'पीएमटी'तली गर्दी व त्यातली भांडणे, पावसातला चहा व गरम भजी, नुकताच सुरु होणारा श्रावण, पांढरा व तांबडा रस्सा, 'सिम्बी'चे थेऊर प्रकरण असे एक ना अनेक विषय, उद्या-परवा कधीतरी ब्लॉग लिहू म्हणून डायरीत टिपून ठेवत होतो. त्यातच 'महेंद्र'जींच्या एका पूर्वीच्या ब्लॉगवरील 'ब्लॉगरने आठवड्यात कमीत कमी चार ब्लॉग तरी लिहावेत' ही सूचना सारखी आठवायची पण ब्लॉग न लिहिणं व स्वत:च्या आळशीपणाची लाज वाटणं याखेरीज काहीही करत नव्हतो. आज शेवटी त्या निर्लज्जपणाचीच थोडीशी लाज वाटली व काहीतरी लिहायचं म्हणून पेन ...